
कार निर्माता कंपनी MG Motor लवकरच आपल्या MG Hector Plus चा 7 सीटर मॉडेल हिंदुस्थानी बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनीने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. हिंदुस्थानात या कारची Tata Harrier, Jeep Compass, Mahindra XUV500 आणि Hyundai Creta शी स्पर्धा होणार आहे.
इंजिन
मिळालेल्या माहितीनुसार, 7 सीटर MG Hector Plus मध्ये 2.0 लिटर 4-सिलेंडर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. जे 170PS ची पॉवर आणि 350Nm पीक टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनसह येऊ शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या MG Hector Plus मध्ये 1.5-Litre Petrol देण्यात आले आहे. जे 141 Hp ची पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन DCT ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे.
फीचर्स
नवीन MG Hector Plus मध्ये 10.4-इंचाची इंफोटेनमेंट सिस्टम दिले जाऊस शकते. जे आय-स्मार्ट तंत्रज्ञानासह सुसज्ज असेल. यात एसयूव्हीमध्ये 6-एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीआयडी, 360-डिग्री कॅमेरा आणि इतर सेफ्टी फीचर्स देण्यात येऊ शकते.
कधी होणार लॉन्च?
कंपनी MG Hector 7 सीटर कार 15 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतसह लॉन्च करू शकते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही कार हिंदुस्थानात लॉन्च होऊ शकते.



























































