गोड खाणं थांबवलं तरी गुलाबजाम-रसगुल्ला हातात दिला! बिग बी म्हणतात, आयुष्यात यापेक्षा मोठं टॉर्चर नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर करत आपल्या आयुष्यात यापेक्षा मोठं टॉर्चर काहीच नाही असं म्हटलंय. या फोटोमध्ये बिग बी यांच्या एका हातात गुलाबजाम आणि दुसऱया हातात रसगुल्ला दिसतोय. हा फोटो त्यांनी एका जाहिरातीसाठी शूट केल्याचे दिसतेय. त्यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये बिग बींनी लिहिलंय, ‘जेव्हा मी गोड पदार्थ खाणं थांबवलं तेव्हा या शूटिंगवाल्यांनी माझ्या हातात गुलाबजाम, रसगुल्ला दिला आणि म्हणतायतं या पदार्थाची चव सांगणारे हावभाव द्या. आयुष्यात यापेक्षा मोठं टॉर्चर काहीच नाही.’ बिग बी यांची ही मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेय.