कर्नाटकच्या शिक्षकाची कमाल, पद्मासन घालत पोहण्याचा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगासनातील ‘पद्मासन’ अवस्था तुम्हाला ठाऊक असेलच. या अवस्थेत कर्नाटकातील शिक्षकाने एक किलोमीटरचे अंतर अवघ्या 25 मिनिटे 16 सेकंदात पोहून पार केलं आहे. यावेळी त्यांचे पाय पद्मासन स्थितीमध्ये बांधण्यात आले होते. नागराजा खारवी पंचुगुडू असे या शिक्षकाचे नाव आहे. ते बंटवल तालुक्यातील कालमंजा भागात उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत. याआधीही त्यांनी आपल्या पोहण्याच्या काwशल्याने अनेकांचे लक्ष वेधले होते. पण आता त्यांनी विक्रम केला आहे.

नागराजा यांनी रविवारी तन्नीरभवी-मंगळुरूच्या समुद्रात सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी पद्मासन घालून पोहायला सुरुवात केली. ते समुद्रकिनारी 9 वाजून 20 मिनिटांनी परतले. नागराजा यांच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद झाली आहे. या विक्रमाचे प्रदीप डिसोझा हे दक्षिण कन्नड जिल्हा स्पोर्टस् विभागाचे अधिकारी साक्षीदार होते.