
राजधानी दिल्लीत कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 96.98 टक्क्यांवर आले आहे. आम्ही सर्वानी मिळून कोरोनाच्या तिसऱया लाटेला रोखण्यात यशस्वी होत आहोत, असा दिलासादायक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केला. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आल्याची चर्चा जोरात असताना केजरीवाल यांनी हा दिलासादायक दावा केला आहे.
With the efforts of the people of Delhi, we have effectively and successfully surpassed the third wave of Corona. Sharing some latest figures | LIVE https://t.co/5srdpYAKDE
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 19, 2020
दिल्लीतील कोरोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाल्याचे सांगताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, खोटी आकडेवारी दाखवून लोकांच्या डोळय़ात धूळ फेकण्याचे काम आपण कदापि करणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, चाचण्या कमी करा आणि कोरोनाग्रस्तांची संख्या कमी दाखवा असा सल्ला आम्हाला काही लोकांनी दिला होता.पण मुख्यमंत्री म्हणून मी अधिकारी आणि डॉक्टरांना नागरिकांचे जीव आपल्यासाठी लाखमोलाचे आहे हे विसरू नका. खोटी आकडेवारी दाखवण्यापेक्षा रुग्णांची खरी संख्या दाखवून त्यांना या रोगाच्या विळख्यातून बाहेर काढा असे आदेश दिल्याचे केजरीवाल म्हणाले.
दिल्ली कोरोनापासून सुरक्षित होतेय
दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आहे. आतापर्यंत 5,93,137 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत केवळ 1418 नवे रुग्ण सापडले आहेत. 24 तासांत कोरोनमुक्त होणाऱया रुग्णांची संख्या 2160 असून बळींची संख्या 37 वर आली आहे. दिल्लीचा कोरोना मृत्युदर 1.66 टक्के, तर कोरोना संक्रमणाचा दर 1.6 टक्के इतका खाली आला आहे. याचाच अर्थ आम्ही वास्तवाशी लढून कोरोनावर नियंत्र मिळवलेय असाच होतो. दिल्ली कोरोनापासून सुरक्षित होतेय यात शंका नाही असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.



























































