अनुष्का शर्मावर फुटलं टीम इंडियाच्या पराभवाचं खापर! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
virat-anushka first good news

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीत टीम इंडियाने 36वर ऑल आऊट होऊन हाराकिरी केली. या लाजीरवाण्या पराभवाचं खापर नेटकऱ्यांनी गर्भवती असलेल्या अनुष्का शर्मावर फोडलं आहे.

हिंदुस्थानी फलंदाजांनी अॅडलेड कसोटीत अक्षरशः लोटांगण घातले. कांगारूंच्या भेदक गोलंदाजीसमोर हिंदुस्थानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाचा दुसरा डाव 36 धावांमध्येच गडगडला. हिंदुस्थानचा कसोटी क्रिकेटमधील हा नीचांक ठरला.

या दारूण पराभवाचं खापर नेटकऱ्यांनी अनुष्का आणि तिच्या होणाऱ्या बाळावर फोडायला सुरुवात केली. विराट कोहली याला ट्रोल करताना त्याच्या नेतृत्वातील टीमच्या पराभवाला अनुष्का जबाबदार असल्याचं म्हटलं. अनुष्का आणि तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेण्यात विराट इतका व्यग्र असतो की खेळावर लक्ष देण्यासाठी त्याला वेळच नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तसंच विराट आणि अनुष्काच्या नात्याची खिल्ली उडवण्यात आली.

चाहत्यांनी राखली बाजू

विराला ट्रोल केलं जाणं अपेक्षित होतं. मात्र, काही नेटकऱ्यांनी जेव्हा अनुष्काला ट्रोल करायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या चाहत्यांनी तिची बाजू राखली. अशा गोष्टींसाठी अनुष्काला जबाबदार धरणं आणि त्यातही त्यांच्या होणाऱ्या बाळावर कमेंट करणं चूक असल्याचं चोख उत्तर तिच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना दिलं.

विराटच्या खराब खेळासाठी अनुष्काला जबाबदार धरलं जाण्याची ही पहिली वेळ नाही. या पूर्वीही विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या पराभवाला तिलाच जबाबदार ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी विराट आणि अनुष्का या दोघांनीही ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला होता.