
पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 54 हजार 398 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्णसंख्या 11 हजार 204 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकूण 15 हजार 453 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 3 लाख 55 हजार 842 रुग्णांपैकी 3 लाख 38 हजार 457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 8 हजार 782 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 603 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.11 टक्के आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 53 हजार 595 रुग्णांपैकी 50 हजार 965 रुग्ण बरे होत घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 883 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 48 हजार 213 रुग्णांपैकी 45 हजार 339 रुग्ण बरे होत घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 1 हजार 193 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 47 हजार 376 रुग्णांपैकी 45 हजार 389 रुग्ण बरे होत घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 261 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 49 हजार 372 रुग्णांपैकी 47 हजार 591 रुग्ण बरे होत घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 85 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 878 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 668 , सातारा जिल्ह्यात 88, सोलापूर जिल्ह्यात 105, सांगली जिल्ह्यात 14 तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 44 आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 671, सातारा जिल्ह्यामध्ये 174, सोलापूर जिल्ह्यामध्ये 160, सांगली जिल्ह्यामध्ये 33 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण 31 लाख 59 हजार 987 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 54 हजार 398 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.





























































