
जुन्नर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. घरात एकटी असणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलीवर बापानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी पेंढार गावात शनिवारी ही घटना घडली. ओतूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित मुलगी घरामध्ये एकटीच होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास आरोपी बापाने तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या आईला घटनेबाबत समजल्यावर तिने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. ओतूर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत नराधम बापाला अटक केली आहे. प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.






























































