पृथ्वी शॉला बळीचा बकरा बनवू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅडलेड कसोटीत हिंदुस्थानी क्रिकेट संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या कसोटीतील पराभवासाठी बळीचा बकरा ठरवला गेला तो युवा मुंबईकर पृथ्वी शॉ. मेलबर्न येथे होणाऱया दुसऱया कसोटीमधून त्याला डच्चू देऊन शुभमन गिलला संधी द्या, असा सूर काही मीडिया आणि टीकाकारांकडून निघू लागला. पण या पराभवासाठी एकटय़ा पृथ्वी शॉला जबाबदार धरणे योग्य नव्हे, असे मत काही क्रिकेटतज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी पृथ्वी शॉची पाठराखण करताना म्हटले की, पृथ्वी अजून लहान आहे. त्याच्या खेळामध्ये पुढे जाऊन नक्कीच सुधारणा होईल.