सिंघू सीमेवर बळीराजाचे उपोषण; रक्तदान, नाशिक ते दिल्ली शेतकऱ्यांची रॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवसेंदिवस पारा घसरत असून थंडीचा कडाका प्रचंड वाढत असला तरी शेतकऱयांचा निर्धार कमी झालेला नाही. सिंघू सीमेवर बसलेल्या शेतकऱयांनी उपोषण सुरू केले आहे. रोज अकरा शेतकरी उपोषण आंदोलन करणार आहेत. तसेच बळीराजाकडून रक्तदानही केले जात आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीच्या सीमेवर 26 दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या आपल्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱयांनी नाशिक ते दिल्ली रॅली काढली आहे. यात हजारो शेतकरी सामील झाले आहेत.

ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वाखाली 3 हजार शेतकरी आज नाशिकहून दिल्लीकडे निघाले. चंदगडमध्ये सोमवारी पहिला मुक्काम झाला. उद्या (दि. 22) आणखी सात हजार शेतकरी सामील होतील. महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत विविध वाहनातून हे शेतकरी या रॅलीमध्ये येणार आहेत. त्यानंतर वाहनांमधून हजारो शेतकरी 1300 कि.मी. अंतर पार करून सिंघू सीमेवर आंदोलनात सहभागी होतील, असे किसान सभेच्या वतीने सांगण्यात आले.

ठोस प्रस्ताव असेल तरच चर्चा

पेंद्रीय कृषी मंत्रालयाकडून विज्ञान भवनात पुन्हा चर्चा करण्यास तयार असल्याचे अवाहन सोमवारी करण्यात आले. त्यावर शेतकरी नेते राकेश टिपैत म्हणाले, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत; पण जोपर्यंत सरकार ठोस प्रस्ताव घेऊन येत नाही तोवर चर्चा होऊ शकत नाही. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. सरकारच्या आजच्या पत्रात काहीही नवीन नाही.

रोज 11 जण उपोषणाला बसणार

– सिंघू सीमेवर सोमवारी 11 शेतकऱयांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. रोज 11 शेतकरी उपोषण करणार आहेत. कृषी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे शेतकऱयांनी सांगितले.

– सिंघू सीमेवर बळीराजाने रक्तदानही करण्यास सुरुवात केली आहे. लुधियानातील स्वयंसेवी संस्थेने शिबीर आयोजित केले असून सोमवारी 240 शेतकऱयांनी रक्तदान केले.