चेन्नईत आजपासून लोकल सुरू, मुंबईत कधी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नईत आज 23 डिसेंबरपासून उपनगरीय लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली आहे. गर्दीच्या वेळा टाळून नॉन पिकअवरमध्ये सर्वसामान्य प्रवासी लोकल प्रवास करू शकतात असे पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

चेन्नईत लोकल सुरू झाल्यानंतर आता मुंबईत लोकल कधी सुरू करणार असा प्रश्न विचारला जात आहे. 25 मार्चनंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर लोकल सेवा आणि रेल्वे सेवाही बंद करण्यात आल्या, मात्र नंतर हळूहळू अनलॉकअंतर्गत लांबच्या विशेष गाडय़ा सुरू झाल्या.

15 जूननंतर मुंबईतही लोकल सेवा सुरू करण्यात आली, मात्र केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी या फेऱया चालविण्यात येत आहेत. त्यानंतर राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या विविध वर्गांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळाली. त्यानंतर महिलांनाही नॉन पिकअवरमध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली, मात्र सर्वसामान्यांसाठी लोकल अजूनही सुरू झालेली नाही.