लेख – अवकाशस्थ ट्रफिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– वैश्विक ([email protected])

या पुढच्या काळात अशी विविध प्रकारची वाहनं रस्त्यावर, रुळांवर आणि आकाशात येत राहणार व त्यामुळे यांच्या दळणवळणाच्या समस्यांवर सतत उपायही शोधावे लागणार. तीच गत दूर आकाशातील ट्रफिकची आहे. तिथेही विविध देशांच्या सरकारी आणि खासगी अवकाशयान प्रकल्पातून गर्दी वाढत आहे. गेल्या 63 वर्षांत अवकाशात पृथ्वीभोवती फिरणाऱया पृत्रिम उपग्रहांची संख्या दिसामासी वाढतेच आहे. आणि ते साहजिकही म्हणावे लागेल. प्रत्येक देश पृथ्वीवर प्रगती करून पुढची पावले टाकण्याच्या विचारात असतो. त्यावेळी एक पाऊल अंतराळात ठेवण्याचेही त्याचे मनसुबे असतात. हिंदुस्थानसह जगातल्या सहा सात देशांकडेच अंतराळात यान पाठवण्याची क्षमता आहे. लहान देशांना त्यांच्या रॉकेट इंधनाचा प्रचंड खर्च परवडत नाही. त्यामुळे आपणही काही देशांचे उपग्रह आपल्याकडून अंतराळात सोडत असतो. एकाच वेळी अनेक उपग्रह सोडण्याचा विक्रमही इस्रोने केला आहे.

यातले बरेचसे उपग्रह पृथ्वीपासून तीन चारशे किलोमीटर अंतरावरून फिरतात. हवामानचा अंदाज, खनिजांसाठी रिमोट सेन्सिंग, प्रॅपिंग अशा मर्यादित उद्देशांसह अवकाशात धाडलेल्या बऱयाच उपग्रहांचं आयुष्य मुळातच कमी असतं. त्यांची पृथ्वीभोवती अंतराळात भिरभिरण्याची गती मंदावली की कक्षाबदल (ऑर्बिट डिके) होत ते पृथ्वीकडे झेपावतात आणि वातावरणाशी घर्षण होत जळून जातात.

मात्र काही बहुउद्देशीय आणि बरीच वर्षं टिकणारी अंतराळयानंही असतात. पृथ्वीपासून 36800 किलोमीटर अंतरावर स्थिर केलेल्या उपग्रहांना भूस्थिर कक्षेतील पिंवा जिओसीन्क्रोनस म्हणतात. एवढय़ा अंतरावरील कक्षेत पृथ्वीच्या विषुववृत्ताला समांतर अशा वॅषुविक वृत्तावरून ते पृथ्वीभोवतीच फिरतात परंतु त्यांचा आणि पृथ्वीचा भ्रमणवेग सारखाच होतो. त्यामुळे विशिष्ट भूभागावर सतत संकेत, प्रक्षेपण करत राहणं शक्य होतं. अशा भूस्थिर कक्षेतील पृत्रिम उपग्रहांचा मुख्य उपयोग संदेशवहन, सेलपह्न सेवा, टीव्ही प्रक्षेपण आणि अन्य महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी होतो. क्रायोजेनिक इंजिन असलेल्या रॉकेटने असा उपग्रह सोडून तो एवढाच दूर स्थिर करणं कठीण काम, परंतु  हिंदुस्थानी वैज्ञानिकांनी तशी यंत्रणा देशातच बनवून तेही साध्य केले आहे.

पृथ्वीजवळच्या कक्षेतून फिरणारे कित्येक पृत्रिम उपग्रह ध्रुवीय कक्षेतून फिरतात. जवळून फिरणाऱया उपग्रहांचा पृथ्वी परिक्रमेचा अवधी साधारण 90 मिनिटांचा असतो. 470 किलोमीटरवर असलेले अंतराळस्थानकही असंच फिरतं. म्हणजे त्यावर 45 मिनिटांचा दिवस आणि 45 मिनिटांची रात्र असते!

1957 मध्ये रशियाचा पहिला पृत्रिम उपग्रह अंतराळात गेल्यापासून आजवर सुमारे 40 देशांचे 8500 पेक्षा जास्त उपग्रह जगातल्या वेगवेगळ्या अंतराळ यान प्रक्षेपण तळांवरून अवकाशात गेले आहेत. त्यातील काही कालपरत्वे नष्टही झाले. आपला आर्यभट 1975 ते 1992 असा अंतराळात फिरत होता. त्याचंही ऑर्बिट डिके (कक्षाऱहास) झाला. या सर्व उपग्रहांपैकी 63 टक्के लो ऑर्बिट म्हणजे पृथ्वीजवळच्या कक्षेतून 6 टक्के मध्यम कक्षेतून तर सुमारे 29 टक्के भूस्थिर कक्षेत आहेत. अमेरिकेचे 829, चीनचे 250, रशियाचे 146, हिंदुस्थानचे 118, जपानचे 72, ब्रिटनचे 52 अशी साधारण आकडेवारी आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन कित्येक वर्षे कार्यरत आहे.

अमेरिकेचो पहिली स्कायलॅब हे स्पेस स्टेशन 1979 मध्ये कक्षाऱहास होत होत 11 जुलै रोजी ऑस्ट्रेलियाजवळ हिंदी महासागरात कोसळले होते. कारण अशा महत्त्वाच्या यानाना सतत ठरावीक कक्षेत ठेवण्याची बूस्टर यंत्रणा 1981पर्यंत उपलब्ध नव्हती.

1687 मध्ये न्यूटनने पहिल्यांदा कृत्रिम उपग्रहाची संकल्पना व्यक्त केली. 1903मध्ये रशियन वैज्ञानिक कॉन्स्टेण्टाइन प्त्सेओल्योवस्की यांनी कक्षेची गती मोजली. नंतर त्यात प्रगती होत 1957मध्ये स्पुटनिक-1 अवकाशात गेला.

अवकाशात फिरणारे उपग्रह रोज सायंकाळी निरभ्र आणि प्रकाश प्रदूषण नसलेल्या अवकाशात सूर्यास्तानंतर तास-दीड तास पाहायला मिळतात. कारण तोपर्यंत तेवढय़ा उंचीवर सूर्यप्रकाश पोचतो. त्यावेळी पृथ्वीवर काळोख असतो. स्पेस स्टेशन तर फारच छान दिसते. आता असे उपग्रह न्याहाळण्यास उत्तम काळ आहे. पण कोरोना एकदाचा जाऊ द्या. मग बघू.

तर मुद्दा असा की, काही वेळा दोन उपग्रहांची अनेक कारणांनी टक्कर होऊ शकते. काही दिवसांपूर्वी रशियन उपग्रह आणि आपल्या उपग्रहाची टक्कर थोडक्यात टळली. याशिवाय अंतराळी दगडगोटय़ांचा धोका या उपग्रहांना असतोच. आता तिथल्या वाढत्या ट्रफिकमुळे वैज्ञानिकांची चिंता वाढून हे उपग्रह सुरक्षित ठेवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे.