रत्नागिरीत ब्रिटनहून आले नऊ प्रवासी, सर्वजण संस्थात्मक विलगीकरणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

ब्रिटन मध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडलेला असल्याने जगभर खळबळ उडाली आहे. ब्रिटन मधून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू असून महिनाभरात ब्रिटनकडून नऊ जण रत्नागिरीत आल्याची माहिती उघड झाली आहे. सर्व प्रवाशांची तपासणी करून त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.

गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाच्या विरोधात लढत आहे. कोरोनावरील लसीच्या प्रतिक्षेत सर्वजण असताना अचानक ब्रिटनमध्ये कोरोनाचा विषाणू वेगळ्या स्वरूपात आढळून आला. त्यानंतर ब्रिटनवरून येणाऱ्या विमानावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान ब्रिटनहून रत्नागिरीत आलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून ब्रिटनहून नऊ जण रत्नागिरीत आले असल्याची माहिती देण्यात आली. सर्वांची तपासणी करून त्यांचे रत्नागिरीत संस्थात्मक विलगीकरण करण्यात आला आहे.

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला असून आरोग्य विभागाने वैद्यकिय अधिकाऱ्यांचे एक शिबिर घेतले असून जे लोक परदेशातून आले आहेत त्यांनी त्यांची माहिती प्रशासनाला कळवावी असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर यांनी सांगितले.