
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सर्वत्र गाजतोय. या 30 सेकंदाच्या व्हिडीओत चिमुकलीने नाचता नाचता पुढे जे काही केलंय ते पाहून सर्वच हैराण झाले आहेत. व्हिडीओत ही चिमुकली प्रभुदेवाच्या तमीळ लक्ष्मी या चित्रपटातील मोरक्का या गाण्यावर थिरकताना दिसतेय. टीव्ही बघता बघता ती अभिनेत्री दित्याच्या हुबेहूब स्टेप फॉलो करताना दिसतेय. या गाण्यात पुढे अभिनेत्रीने बसच्या हँडलला लटकुन स्विंग केले आहे. ही स्टेप पाहिल्यानंतर चिमुकलीनेदेखील टेबलावरील टीव्हीला लटकुन स्विंग करण्याचा प्रयत्न केला. यात टेबलावरचा टिक्हीच खाली पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे पालकच हा व्हिडीओ शूट करत होते. परंतु आपली मुलगी पुढे असे काही करेल अशी कल्पना त्यांना नव्हती.

























































