
हिंदुस्थानी खेळाडूंना गुलाबी चेंडूने खेळण्याचा सराव नव्हता. त्यामुळे टीम इंडिया पराभूत झाली अशी टीका होऊ लागली. यावर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला, जगातील 90 टक्के कसोटी क्रिकेट हे लाल चेंडूनेच खेळले जात आहे. त्यामुळे रणजी किंवा दुलीप यांसारख्या स्थानिक स्पर्धांमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करायला हवा असे म्हणणे योग्य ठरणार नाही. जेव्हा गुलाबी चेंडूसह होणारी कसोटी असेल किंवा गरज असेलच तेव्हाच त्याचा वापर करण्यात यावा, असे सचिन तेंडुलकरला वाटते.





























































