
कोर्टात हजेरी लावता येऊ नये म्हणून भाजप आमदार राकेश सिंह बघेल कोरोना झाल्यचा बनाव केला होता. तसा खोटा रीपोर्टही त्यांनी सादर केला होता. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशचे भाजप आमदार राकेश सिंह बघेल यांच्यावर 2010 साली सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला गेली चार वर्षे न्यायलयात सुरू आहे. बघेल यांना आदेश देऊनही ते कोर्टात हजर झाले नाही.
गैरहजर राहण्यासाठी बघेल यांनी वेळोवेळी अनेक कारणे दिली. आता कोरोना काळात आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसा रीपोर्टही त्यांनी सादर केला. हा रीपोर्ट खोटा असल्याचे निष्पण्ण झाले. या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयालाही सहआरोपी करण्यात आले आहे. कारण कार्यालयाचाही त्या सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आमदार बघेल आणि मुख्यमंत्री कार्यलयाविरोधात साथरोग कायद्याअंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































