
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर सर्वत्र सतर्पतेचा इशारा दिलेला असतानाच आता स्पेन, कॅनडा आणि स्वीडनमध्येदेखील कोरोनाच्या नवा स्ट्रेनची प्रकरणे समोर आल्याने स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे. यात स्वीडनमध्ये एक तर कॅनडामध्ये दोन प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे सर्व प्रवासी काही दिवसांपूर्वीच ब्रिटनहून परतले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, तपासात या तिघांमध्येही कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी सतर्पतेचा इशारा दिला आहे. मात्र त्यानंतरही इतर देशांमध्ये हा स्ट्रेन पसरण्याची भीती वर्तविली जात आहे. काही दिवसांपूर्वीच जपान आणि फ्रान्समध्ये या नवा स्ट्रेन आढळून आला होता. यात आता आणखीन भर पडली असून आता स्पेन, पॅनडा आणि स्वीडनमध्येदेखील या नव्या स्ट्रेनच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तर दुसरीकडे ब्रिटनमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी नव्या संशोधनास सुरुवात केल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘द हेल्थ’ मासिकाच्या अहवालानुसार नव्या ड्रग्जच्या संशोधनाची तयारी सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ हे संशोधन करीत असल्याचे कळते.
- आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 8.07 कोटींहून अधिक प्रकरणे समोर आली असून सुमारे 5 कोटी 68 लाख जण कोरोनातून बरे झाले आहेत.
- 17 लाख 64 हजार जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
स्लोवाकियामध्ये लसीकरणास सुरुवात
जगभराचे लक्ष सध्या कोरोनाच्या लसीकरणावर लागून राहिले आहेत. शनिवारपासून स्लोवाकियामध्येदेखील कोरोनाच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि हायरिस्क असणाऱया लोकांना लस देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी ब्लादिमीर व्रैसेरी हे कोरोनाची लस घेणारे पहिले गृहस्थ ठरले आहेत.
ही अखेरची महामारी नाही – जागतिक आरोग्य संघटना
कोरोना विषाणू ही जगातील अखेरची महामारी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जोपर्यंत जलवायू परिवर्तन आणि पशुकल्याणाच्या प्रश्नावर आपण तोडगा काढत नाहीत तोपर्यंत मानवी आरोग्यात सुधारणा होईल अशी कोणतीही शक्यता नसल्याचे आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर कोरोनाच्या लढाईत फक्त वाटेल तेवढे पैसे खर्च करून फायदा नसून आपल्याला भविष्यासाठी तयारी करणे महत्त्वाचे असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य ट्रेडोस गेब्रयेसस यांनी सांगितले.



























































