दिल्लीचे मादाम तुसाद संग्रहालय लवकरच नव्या जागेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक प्रथितयश, जगविख्यात व्यक्तींच्या मेणाच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध असलेले दिल्लीच्या कZनोट प्लेस येथील मादाम तुसाद संग्रहालय आता नवीन जागेत जाणार आहे. सध्या रिगल बिल्डिंगमध्ये हे संग्रहालय सुरू होते. लॉकडाऊनमुळे हे संग्रहालय सध्या बंद आहे. नवीन जागेची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे सध्या संग्रहातील सर्व मेणाच्या पुतळ्यांना नोएडा येथील एका गोदामात ठेवण्यात आले आहे. मादाम तुस्सा संग्रहालय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि आशियातील 23 पेक्षा अधिक शहरांमध्ये उभारण्यात आलेले आहे. दिल्लीतील संग्रहालयात 1 जानेवारी 2018 रोजी सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा गांधी, बिग बी अमिताभ बच्चन, राज कपूर, कपिल देव, विराट कोहली, मधुबाला, कतरिना कैफ आदी 50 व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. मर्लिन एन्टरटेन्मेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे संग्रहालयाचा कारभार आहे. मेणाचे पुतळे खराब होऊ नयेत, वितळू नयेत, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे.