वर्षाअखेरीस हुडहुडी वाढली, मुंबईचा पारा 15 अंशांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षाअखेरीस मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे, पालघर जिह्यांत थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी मुंबईत मोसमातील सर्वात कमी तापमान नोंद झाले. सांताक्रूझमध्ये पाऱयाने 15 अंशांची नीचांकी पातळी गाठली. याचवेळी शहराचे कमाल तापमानही जवळपास 3 अंशांनी घटले. शेजारच्या डहाणूचे तापमान 13 अंशांपर्यंत खाली आले. पाऱयाच्या या घसरणीमुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार, मंगळवारी पुलाबा आणि ठाण्यात 17 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान होते. त्याचबरोबर पुण्यात 13, नाशिक- 11.8, संभाजीनगर- 12.4, नांदेड- 12.5, नागपूर- 14.2 तसेच अमरावतीमध्ये 14.8 अंश किमान तापमान नोंदवले गेले. उत्तरेकडून येणाऱया थंड वाऱयांमुळे मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्राच्या बऱयाच भागांतील तापमानात घट झाली आहे. पुढील 48 तास गारठा कायम राहील, असे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे.