
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपला गळती लागली आहे. पक्षातील हुपूमशाहीला पंटाळून भरुच मतदारसंघाचे खासदार आणि माजी पेंद्रीय मंत्री मनसुख वसवा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमधील वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी लोकसभाध्यक्षांकडे मी खासदारकीचा राजीनामा देईन असे त्यांनी सांगितले.
कृषी कायद्यावरून पेंद्रातील सत्ताधारी भाजपचे मित्र पक्ष एकएक करून साथ सोडून जात आहेत. त्यातच पक्षांतर्गत पुरबुरीवरून गुजरातमधील भाजचे ज्येष्ठ नेते खासदार मनसुख वसवा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमधून बाहेर पडले आहेत.
राजीनामा का दिला?
मनसुख वसवा यांनी गुजरात भाजप अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी, भाजपने मला खूप काही दिले. मी एक सामान्य माणूस आहे. मात्र, आदिवासींशी संबंधित काही मुद्यांवरून पक्षासोबत असलेल्या मतभेदांमुळे आपण भाजपमध्ये राहू शकत नसल्याचं म्हटलं आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांना पाच पत्रे पाठवली, पण त्यापैकी एकाही पत्राला उत्तर मिळालेले नाही.
काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील भाजप सरकारने नर्मदा जिल्हय़ातील 121 गावांचा समावेश पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील परिसरामध्ये केला होता. खा. मनसुख वसवा यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता.
स्टॅच्यु ऑफ युनिटीसंदर्भात वसावा यांनी पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिले होते. मोदींना लिहिलेल्या पत्रामधून त्यांनी स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या आसपासच्या परिसरातील इको सेंसेटिव्ह झोन रद्द करण्याची मागणी केली होती.

























































