
ख्रिसमस विकेंडला पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल असलेल्या मालवणला थर्टीफस्टसाठी पर्यटकांची प्रतीक्षा आहे. ख्रिसमसच्या तुलनेत 50 टक्केही पर्यटक थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठी मालवणात नसल्याचे चित्र आहे.
ख्रिसमस प्रमाणे सलग नसलेल्या सुट्ट्या यासोबत महानगर पालिका क्षेत्राप्रमाणे जर प्रशासनाने अचानक नाईट कर्फ्यु लागू झाला तर. एन्जॉय करता येणार नाही. या विचारानेही काही जणांनी केलेले बुकिंग रद्द केले. तर 31 डिसेंबर रोजी असलेला मार्गशीर्ष गुरुवार याचाही परिणाम झाल्याचे काही पर्यटन व्यवसाईकांनी सांगितले आहे. यासर्वा बरोबर ब्रिटन देशात आढळलेला नव्या कोरोना विषाणूचा शिरकाव देशात झाल्याने त्याचीही भीती पर्यटकांनी घेतल्याचे बोलले जात आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने 31 डिसेंबर व 1 जानेवारी (नववर्षं स्वागत) साठी मार्गदर्शक तत्वे जारी करून शक्यतो घराबाहेर न पडण्याचे व गर्दी टाळण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या दृष्टीने पोलिसांनी आवाहन केले आहे. या आवाहनालाही प्रतिसाद मिळत आहे.
ख्रिसमस विकेंडला आलेल्या पर्यटकातील काही पर्यटक 31 डिसेंबर पर्यत बुकिंग करून मालवणात आहेत. तर 25 ते 50 टक्के बुकिंग काही हॉटेल मध्ये आहे. किनारपट्टीवरही पर्यटकांची गर्दी कमी दिसून येत आहे. एकूणच पर्यटकांची संख्या मालवणात घटली असल्याचे चित्र आहे.
कोणतेही कार्यक्रम नाहीत
सिंधुदुर्गात दरवर्षी काही ठिकाणी बीच फेस्टिव्हल व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत होते. मात्र यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर कोणतेही कार्यक्रम नसल्याचा परिणामही घटलेली पर्यटक संख्येवर आहे.

























































