31 जानेवारीपर्यंत राज्यात निर्बंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या अर्थचक्राला गती देताना मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले. टप्प्याटप्प्याने सर्व सुरू करीत असतानाच परदेशात आलेल्या कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे राज्य सरकारनेही सावध पावले उचलली आहेत. मिशन बिगिन अगेनअंतर्गत अनलॉक करताना काही निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. राज्यात लॉकडाऊनचे हे निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे सरकारकडून आज जाहीर करण्यात आले आहे.

जगावर असणारे कोरोनाचे संकट टळण्याकडे लक्ष लागले असतानाच कोरोनाच्या नव्या स्वरूपाचे सावट गडद होऊ लागले.  देशातही नव्या विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. यामुळे विशेष खबरदारी घेण्यात येत असून राज्यात 31 जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन आधीप्रमाणेच लागू राहील असे जाहीर केले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. याआधी 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला मिशन बिगिन अगेनअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स 31 जानेवारीपर्यंत लागू राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.