
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव एसटीचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी बसचालक गोपीनाथ महादेव जाधव यांनी प्रसंगावधान राखत सुसाट बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गोदामात घुसवली. त्यामुळ मोठी दुर्घटना टळली आहे. जालना शहरातील कन्हैय्या नगरजवळील दत्तनगर परिसरात गुरूवारी ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झालेली नाही.
ही बस संभाजीनगरहून रिसोडकडे जात होती. घटनेच्या वेळी बसमध्ये 15 प्रवासी होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. या अपघातात बस आणि गोदमाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिकांनी प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. सकाळची वेळी अपघात झाल्याने रस्त्यावर गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेने गोदामाचे आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे.




























































