
आयसीसीकडून कसोटी क्रिकेटमधील ताजा रँकिंग गुरुवारी जाहीर करण्यात आली. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज व कर्णधार केन विल्यमसनने फलंदाजीच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर धडक मारली. या वर्षअखेरीस तो पहिल्या क्रमांकावर राहील. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स गोलंदाजीत तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
अव्वल दहामध्ये हिंदुस्थानी खेळाडू
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचीही आगेकूच दिसून आली. विराट कोहली दुसऱया स्थानावर कायम असून मेलबर्न कसोटीत शतक झळकावणाऱया अजिंक्य रहाणेने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. चेतेश्वर पुजारा दहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये रविचंद्रन अश्विन सातव्या आणि जसप्रीत बुमराह नवव्या स्थानावर आहे.
अव्वल पाच फलंदाज
केन विल्यमसन (न्यूझीलंड) – 890 रेटिंग
विराट कोहली (हिंदुस्थान) – 879 रेटिंग
स्टीवन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – 877 रेटिंग
मार्नस् लाबुशेन (ऑस्ट्रेलिया) – 850 रेटिंग
बाबर आझम (पाकिस्तान) – 789 रेटिंग
अव्वल पाच गोलंदाज
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – 906 रेटिंग
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 845 रेटिंग
नील वॅगनर (न्यूझीलंड) – 833 रेटिंग
टीम साऊथी (न्यूझीलंड) – 826 रेटिंग
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – 804 रेटिंग
अव्वल पाच अष्टपैलू
बेन स्टोक्स (इंग्लंड) – 446 रेटिंग
जेसन होल्डर (वेस्ट इंडीज) – 423 रेटिंग
रवींद्र जाडेजा (हिंदुस्थान) – 416 रेटिंग
शाकीब हसन (बांगलादेश) – 366 रेटिंग
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – 301 रेटिंग
























































