भाजपमध्ये तयार झाले नवे पद ; कोणाला मिळाली जबाबदारी, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपने पक्षात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. भाजपने ‘ऑर्गनायझर’ ( संयोजक, समन्वयक) हे नवे पद निर्माण केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा केली आहे. पक्षाचे संयुक्त सरचिटणीस (संघटना) व्ही. सतीश यांची नव्याने तयार केलेल्या ‘संयोजक’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर सह-सरचिटणीस (संघटना) उपाध्यक्षपदी कार्यरत असलेल्या सौदन सिंग यांचीही याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

संयुक्त संयोजक सचिव पदावर कार्यरत असलेले शिवप्रकाश त्याच पदावर कार्यरत असतील. मात्र, त्यांच्या जबाबदारीत आणि कामकाजात बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पक्षाचे काम पाहणारे प्रकाश आता भोपाळमध्ये असून मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे काम पाहणार आहेत.

सतीश पक्षाचे संसदीय कार्यालय, एससी, एसटी मोर्चा आणि त्याचा विशेष संपर्क कार्यक्रम यांच्यात समन्वय साधणार आहेत. यापूर्वी त्यांनी राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात भाजपाच्या सर्व महत्वाच्या राज्यांमध्ये काम केले आहे. रायपूरमध्ये असलेले आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंडमध्ये पक्षाचे काम पाहणारे सौदन सिंह आता चंदीगडसह हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश आणि केंद्र शासित प्रदेशची जबाबदारी सांभाळणार आहेत. हे तिन्ही नेते पूर्णवेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यांना भाजपाच्या विचारसरणीचा प्रसार केला आहे.