शिवराज सरकारचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्तार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेश येथील शिवराज सिंग चौहान सरकारचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. गेल्या वर्षभरापासूनचे हे तिसरे मंत्रिमंडळ विस्तार आहे. येत्या रविवारी दुपारी 12.30 वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा रंगणार आहे. या शपथविधी सोहळ्यानंतर मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायधीश मोहम्मद रफिक यांचा शपथविधी सोहळा दुपारी 3 वाजता पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात ज्योतीरादित्य सिंधीया यांचे समर्थक तुसली सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणाऱया उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे नव्या मंत्र्यांना गोपीनियतेची शपथ देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित लोकांच्या उपस्थितीत राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार असून फक्त 150 जणांना प्रवेश दिला जाणार असल्याचे कळते. यासंदर्भात शुक्रवारी राजभवनात विशेष बैठक बोलविण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.