
जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशत्तवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात सात नागरिक जखमी झाले आहेत.
#UPDATE | Seven civilians have suffered minor injuries in grenade attack in Tral, Pulwama. Health condition of all the injured is stable: Jammu and Kashmir Police https://t.co/aR2LOouUuY
— ANI (@ANI) January 2, 2021
मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर ग्रेनेड फेकला. हे जवान त्राल बस स्थानकाजवळ उभी होती. पण दहशतवाद्यांचा नेम चुकल्याने जवान वाचले, परंतु हा ग्रेनेड रस्त्यावर फुटला आणि त्यात सात निरपराध लोक जखमी झाली. सुरक्षादलाने तत्काळ या भागात घेराव घातला आणि दहशतवद्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.



























































