हत्तींमध्ये रंगली फुटबॉलची मॅच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मिडियावर सध्या दोन हत्तींचा फूटबॉल खेळतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हे हत्ती कधी खेळताना तर कधी मस्ती करताना दिसत आहेत. या हत्तीची फूटबॉल खेळण्याची स्टाईल पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. मैदानात फुटबॉल खेळायला गेल्यावर एक हत्ती फूटबॉल सोंडेत लपवून पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरा हत्ती त्याच्याकडून फुटबॉल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटवर शेयर केलेल्या या व्हिडिओला 3500 हजारांहून अधिक ह्यूज आणि 141 वेळा रिट्विट केले आहे.