
हिंदुस्थानी रेल्वेने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हिंदुस्थानी रेल्वेने जगातील पहिली ‘हॉस्पिटल ट्रेन’ बनवली आहे. हिंदुस्थानात अशी ही विशेष ट्रेन आहे, जशी जगात कुठल्याही देशाने अद्यापि सुरू केलेली नाही.
हिंदुस्थानी रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असणाऱया या ट्रेनचे नाव ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ असें ठेवले आहे. रेल्वेच्या अधिकृत ट्विटरनुसार ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ सध्या आसामच्या बदरपूर स्टेशनवर उभी आहे. या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणे आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि पाच ऑपरेटिंग टेबलसह इतर सर्व सुविधा आहेत.
विशेष म्हणजे, ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’मध्ये रुग्णांवर मोफत उपचार केला जाणार आहे. कोराना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी रेल्वेने याआधीच प्रवाशांच्या सरक्षेच्या दृष्टीने अनेक पावले उचलली आहेत. यात रेल्वे स्थानकावर ऑटोमॅटीक तिकीट तपासणी यंत्र यासह अनेक सुविधांचा समावेश आहे.
अशी आहे ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’
लाईफलाईन एक्सप्रेस ट्रेन एकूण 7 डब्ब्यांची आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चिकित्सकांची टीम तैनात आहे. या विशेष ट्रेनमध्ये आतापर्यंत 1 लाख 46 हजार रुग्णांवर शस्त्र्ाक्रिया करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये कर्करोग, मोती बिंदू अशा अनेक आजारांवर उपचार केले जातात. सर्वात प्रथम हिंदुस्थाननेच अशाप्रकारच्या हॉस्पीटल ट्रेनची उभारणी केली आहे. त्यानंतर आता इतर देशही अशी ट्रेन सुरू करण्याचा विचार करीत आहेत.




























































