राम गोपाल वर्मांचा मुंबईला रामराम; गोव्यात झाले शिफ्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मुंबईला रामराम केला आहे. मुंबई शहर कायमचे सोडून ते गोव्यात शिफ्ट झाले आहेत. निवासस्थान जरी बदलले असले तरी वर्मा यांनी मुंबईतील कार्यालय मात्र कायम ठेवले आहे. एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी हा खुलासा केला. सध्या आपण ज्या प्रोजेक्टवर काम करत आहोत त्यासाठी गोवा हे योग्य ठिकाण असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. मुंबईत मी कधीच फार काळ राहायला नव्हतो आणि लॉकडाऊनच्या काळातही हैदराबादमध्येच होतो. कोरोना संकटानंतर आता प्रत्येकजण ऑनलाइन संपर्क माध्यमांचाच जास्तीत जास्त वापर करतो. त्यामुळे कुठेही राहिलो तरी संपर्क कायम ठेवता येऊ शकतो असे वर्मा यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. ‘12 ऑ क्लॉक’ हा त्यांचा भयपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच काही वेबसीरिजही त्यांनी बनवल्या आहेत.