राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुग्ण आढळले आहेत. ‘व्हायरसचा हा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य आहे. 70 टक्के अधिक झपाटय़ाने संसर्ग होऊ शकतो. काळजी घ्यावी, सजग राहावे इतकेच महत्त्वाचे आहे,’ असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना कोरोना लसीकरण तसेच कोरोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. ‘राज्यात सध्या आठच रुग्ण असून त्यांच्या कॉण्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरू आहे. त्यांच्या संपका&तील कोणीही पॉझिटिव्ह आढळलेला नाही. कोणी पॉझिटिव्ह आढळला तरी कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालाय का हे आधी तपासावे लागेल. नव्या प्रकाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणी पॉझिटिव्ह नाही’ असे राजेश टोपे यांनी सांगितले.
दारिद्रय़ रेषेखालील लोकांना मोफत लस देण्यासाठी पेंद्राकडे आग्रह
‘लसीकरणासाठी यादी काढण्याचा आदेश जिह्यांना दिला आहे. यामध्ये मुख्यत्वे आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि इतरांचा समावेश असेल. अंदाजे तीन कोटी लोकांना लस मिळेल असा अंदाज आहे. दारिद्रय़रेषेच्या खाली असणाऱ्यांना मोफत लस दिली पाहिजे, असा आग्रह आपण पेंद्राकडे करणार,’ असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्याच्या अखत्यारीतील लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही
‘गरीबांना लसीसाठी खर्च करायला लावणं योग्य नाही. तो खर्च पेंद्राने करावा अशी विनंती आम्ही पेंद्राकडे करणार आहोत. जर पेंद्राने नाहीच केला जर राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. राज्याच्या अखत्यारीत असणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही,’ असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.
राज्याने काळजी घेण्यात कोणतीही तडजोड केलेली नाही
ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासंबंधी नियमावली करण्यात आली होती. सात दिवस संस्थात्मक क्वारंटाइनची सक्ती करण्यात आली होती. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरात क्वारंटाइन होण्यास सांगितले होते. राज्याने काळजी घेण्यामध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही,’ असे राजेश टोपे यांनी सांगितले
नव्या कोरोनाच्या पाच रुग्णांपैकी दोन जण निगेटिव्ह
परदेशातून परतलेल्या हिंदुस्थानी प्रवाशांपैकी सोमवारी नव्या कोरोना विषाणूचे मुंबईत 5 रुग्ण सापडल्यामुळे मुंबईकर टेन्शनमध्ये होते. मात्र, या पाचपैकी दोघा रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून तिघा जणांची प्रपृती स्थिर आहे. तर या रुग्णांच्या संपका&त आलेल्या 40 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. ब्रिटनसह इतर देशांतून सुमारे 4 हजार प्रवासी मुंबईत आले. यापैकी 26 कोरोना पॉझिटिव्ह आले होते. यातील 14 जण निगेटिव्ह आले. या 26 प्रवाशांचे नमुने चाचणीसाठी पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेकडे जिनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील मुंबईतील 5 जणांमध्ये ब्रिटनमधील नवे कोरोना विषाणू असलेले रुग्ण सापडले.



























































