
लातूरमधील एका ट्रक चालकाचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 जानेवारी तुळशीरम मोकाशे सोयाबीनने भरलेला ट्रक घेऊन जात होते. तेव्हा अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार करत मोकाशे यांचा खून केला आहे. मोकाशे यांचा खून सोयाबीन चोरण्याच्या उद्देशाने झाला असावा असा अंजाद व्यक्त करण्यात येत आहे.



























































