
रायगड जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. वऱ्हाडाने भरलेला ट्रक सुमारे 300 फूट दरीत कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक भरून एक वर्हाड लग्नाला जात होते. तेव्हा हा ट्रक कुडपान येथे 300 फूट दरीत कोसळला. त्यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह हाती लागले असून अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस, ट्रेकर्स रवाना झाले आहेत. घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.



























































