साहित्य संमेलन नाशिकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकला मार्चमध्ये होणार आहे. नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीला यजमानपद देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.

साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे (दिल्लीसाठी) एक आणि अंमळनेरचे एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेरनिमंत्रण पाठविले होत़े या फेरनिमंत्रणात ‘सरहद’ने मे महिन्यात दिल्लीत संमेलन देण्याची मागणी केली होती. मात्र महामंडळाने स्थळनिवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले असे ठाले म्हणाले.

24 रोजी अध्यक्षपदाची निवड

23 आणि 24 जानेवारीला नाशिक येथे मार्गदर्शन मंडळाची बैठक होणार असून, 24 रोजी संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. यासाठी सर्वच शाखांनी आपल्या पसंतीची नावे महामंडळाकडे द्यावीत. 24 रोजी महामंडळाचे सदस्य अध्यक्षांची निवड करतील, असे ठाले पाटील म्हणाले.