चौथीपर्यंत शिकलेल्या आजोबांनी तयार केली 4 भाषांमध्ये डिक्शनरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याच्या डिजिटल युगात जगभरातली माहिती आपल्याला एका क्लिकवर चुटकीसरशी उपलब्ध होते. गुगल ट्रान्सलेटसारख्या सॉफ्टवेअरमुळे विविध भाषा समजून घेणेदेखील सोपे झाले आहे. परंतु ज्या लोकांचा अजूनही इंटनेटशी फारसा संबंध येत  नाही  त्यांच्यासाठी  आजही  पुस्तक  हे  महत्त्वाचे  माध्यम  आहे.  आज  तुम्हाला  अशा  व्यक्तीबद्दल सांगणार आहोत  ज्यांनी  एक,  दोन  नव्हे तर तब्बल  4 भाषांमध्ये डिक्शनरी  बनवली आहे.  वयाच्या 83 व्या वर्षी नजात्तेला श्रीधरण यांनी ही डिक्शनरी तयार केली असून आर्श्चयाची बाब म्हणजे त्यांचे शिक्षण केवळ चौथी पर्यंत झाले आहे.

केरळच्या तालासरी परिसरात श्रीधरण वास्तव्यास आहे. त्यांनी दक्षिण हिंदुस्थानात बोलल्या जाणाऱया तमीळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये डिक्शनरी  तयार केली आहे. त्यांच्या डिक्शनरीत  मल्याळम शब्दासाठी कन्नड, तमीळ आणि तेलुगूमध्ये अर्थ सापडतो. यापूर्वी दीडशे वर्षांपूर्वी म्हणजे 1872 मध्ये हर्मन गंडर्ट यांनी मल्याळम-इंग्रजी डिक्शनरी तयार केली होती.

ही डिक्शनरी म्हणजे श्रीधरण यांच्या 25 वर्षांची मेहनत आहे. याबाबत ते म्हणाले, चौथीत शाळा सोडल्यावर मी बिडी बनवण्याच्या कारखान्यात काम केले. पुढे ईएसएलसी परीक्षा पास करून सार्वजनिक बांधकाम  विभागात  काम केले. 198 पासून मी शब्दकोशावर काम करायला सुरुवात केली. 1994 ला स्वेच्छानिवृत्ती  नंतर माझा सर्व वेळ  शब्दकोशासाठी दिला.