
रिषभ पंत, हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्विन यांनी दुखापतीसह सिडनी येथील तिसऱया कसोटीत झुंजार फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. हनुमा विहारी व रवीचंद्रन अश्विन या जोडीने तब्बल साडेतीन तास खेळपट्टीवर ठाण मांडला आणि 259 चेंडूंचा सामना करीत 62 धावांची अभेद्य भागीदारी करताना हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. हिंदुस्थानी संघाने चौथ्या डावात 131 षटके फलंदाजी करीत ही कसोटी ड्रॉ राखली आणि गावसकर – बॉर्डर करंडकात 1-1 अशी बरोबरी कायम ठेवली.




























































