
सोशल मीडियात सध्या खऱयाखुऱया बाहुबलीचा व्हिडिओ चांगलाच गाजतोय. डोक्यावर पेटी उचलावी अगदी तितक्याच सहजतेने व्हिडिओत दिसणारा माणूस डोक्यावर स्पोर्टस् बाईक उचलताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी ‘खराखुरा बाहुबली’ अशा आशयाची कमेंट्स केली आहे.
व्हिडिओतील माणसाची शरीरयष्टी फारशी प्रभावी दिसत नसली तरी डोक्यावर अगदी सहजतेने त्याने 140 किलो वजनाची बाईक उचलली आहे. ही बाईक तो शिडीच्या सहाय्याने बसवर एका झटक्यात चढवताना दिसतोय. 2 लाखांपेक्षा अधिक ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.


























































