सिंधू जिंकली, पण… श्रीकांतचा तिन्ही लढतींत पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने वर्ल्ड टूर फायनल्स या बॅडमिंटन स्पर्धेतील शेवट गोड केला. महिला एकेरीच्या अखेरच्या लढतीत तिने पोर्नपावी चोचूवोंग हिला हरवले. मात्र वर्ल्ड टूर फायनल्स या बॅडमिंटन स्पर्धेतील तिचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. पुरुष एकेरीच्या तिन्ही लढतींत किदाम्बी श्रीकांतला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. पी.व्ही. सिंधूने पोर्नपावी चोचूवोंग हिला 21-18, 21-15 अशा फरकाने पराभूत केले. दरम्यान, एनजी का लाँग एंजस याने किदाम्बी श्रीकांतचे कडवे आव्हान 12-21, 21-18, 21-19 अशा फरकाने परतवून लावले.