
मालाड पूर्व-पश्चिमेसाठी एकच पालिका विभाग कार्यालय असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मालाडकरांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी पी-उत्तर विभाग कार्यालयाचे विभाजन करण्यात येणार असून पूर्व आणि पश्चिमसाठी दोन विभाग कार्यालये बनवण्यात येणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आमदार सुनील प्रभू यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
मालाड पूर्व-पश्चिमेसाठी एकच पालिका विभाग कार्यालय आहे. त्यामुळे मालाडकरांची मोठी गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर व्हावी, यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश येऊन नगरविकास कार्यालयाने मंजुरी दिली होती. तसेच महापालिका स्तरावर याबाबत बैठका झाल्या होत्या. परंतु पूर्व भागाकरता अद्याप जागा निश्चित झाली नसल्यामुळे जागा निश्चित करून इमारतीकरता अर्थसंकल्पात तरतूद करून येणाया वर्षात महापालिका प्रभाग कार्यालय सुरू करण्यात यावे, या करता पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रभू यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुंबई उपनगर जिह्याचे आदित्य ठाकरे यांनी दिले.
रेशनिंग कार्यालयासाठी जागा मिळणार
मालाड पूर्व आणि पश्चिम भागाकरता एकच रेशनिंग कार्यालय असून पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पूर्व भागाकरता स्वतंत्र विभाग कार्यालय मंजूर झाले आहे. मात्र, कार्यालयाकरता जागा उपलब्ध झाली नसून या करतादेखील विशेष बैठक बोलावून कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम कोरोना टाळेबंदीच्या कालावधीत मंदावले आहे. या कामाला गती देण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले आहे.



























































