विभाग क्रमांक 1 मधील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख-पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विभाग क्रमांक 1 मधील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत.

मागाठाणे विधानसभा

विभाग युवती अधिकारीपदी प्रतीक्षा सावंत यांची तर उपविभाग युवती अधिकारीपदी पल्लवी पांचाळ (शाखा 3, 4, 5, 11), श्वेता बांदल (शाखा क्र. 12, 14), श्रद्धा प्रभू (शाखा क्र. 25, 26) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभा समन्वयकपदी संपदा सावंत, आदिती पालव यांची तर विधानसभा चिटणीसपदी श्रुती गवस (शाखा क्र. 3, 4), तृप्ती कुरले (शाखा क्र. 5, 11), पृथा पाटील (शाखा क्र. 12, 14), दीपाली आचरेकर (शाखा क्र. 25, 26) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी गीता सुतार (शाखा क्र. 3), शाखा समन्वयकपदी सोनिया राक्षे (शाखा क्र. 3) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शाखा युवती अधिकारीपदी समीक्षा पालव (शाखा क्र. 4), शाखा समन्वयकपदी गौतमी पांचाळ (शाखा क्र. 4), शाखा क्र. 4 च्या उपशाखा युवती अधिकारीपदी श्रद्धा बच्चे, श्वेता वारंगे, रविना वारे, नेहा पाटील, अंकिता अहिरे यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

शाखा युवती अधिकारीपदी कोमल महामनी (शाखा क्र. 5), शाखा समन्वयकपदी यामिनी लोटांकर (शाखा क्र. 5), शाखा युवती अधिकारीपदी निर्मला कवडे (शाखा क्र. 11), उपशाखा युवती अधिकारीपदी युक्ता जनाटे (शाखा क्र. 11), शाखा युवती अधिकारीपदी अंजली आलनकुटे (शाखा क्र. 14), शाखा समन्वयकपदी निर्मिती कदम (शाखा क्र. 14), उपशाखा युवती अधिकारीपदी सेजल तांबे (शाखा क्र. 14), शाखा युवती अधिकारीपदी अक्षता रावनांक (शाखा क्र. 25), शाखा समन्वयकपदी पूजा लोखंडे (शाखा क्र. 25), उपशाखा युवती अधिकारीपदी तेजश्री शिबे (शाखा क्र. 25), उपशाखा युवती अधिकारीपदी नमिता सावंत (शाखा क्र. 25), शाखा युवती अधिकारीपदी किर्ती घाग (शाखा क्र. 26), शाखा समन्वयकपदी रिंकू राऊत (शाखा क्र. 26) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

दहिसर विधानसभा

विभाग युवती अधिकारीपदी धनश्री कोलगे यांची तर उपविभाग युवती अधिकारीपदी अद्विता पंजारी (शाखा क्र. 1, 7, 8, 10), भक्ती राणे (शाखा क्र. 2, 3, 6) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभा समन्वयकपदी तेजस्वी शिंदे यांची तर विधानसभा चिटणीसपदी प्रचीती चेरकर (शाखा क्र. 1, 7, 8, 10), हर्षदा जाधव (शाखा क्र. 2, 3, 6) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी शृतिका वेंगुर्लेकर (शाखा क्र. 2), प्रियंका जामले (शाखा क्र. 3), अश्विनी सरमळकर (शाखा क्र. 6), हेतवी म्हात्रे (शाखा क्र. 7), कोमल देवे (शाखा क्र. 8), रिया पगार (शाखा क्र. 10) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

बोरिवली विधानसभा

विभाग युवती अधिकारीपदी सलोणी आत्रे, उपविभाग युवती अधिकारीपदी पूजा घोलप (शाखा क्र. 15, 17, 18), श्रुती पुंदिर (शाखा क्र. 9, 13, 16) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी पल्लवी चाळके (शाखा क्र. 9), शाखा समन्वयकपदी प्रियंका पाडावे (शाखा क्र. 9), शाखा युवती अधिकारीपदी कविता शिंदे (शाखा क्र. 13) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी प्रियंका सालगावकर (शाखा क्र. 16), उपशाखा युवती अधिकारीपदी अंकिता चव्हाण (शाखा क्र. 16), शाखा युवती अधिकारीपदी स्नेहा सावंत (शाखा क्र. 17), शाखा युवती अधिकारीपदी सोनाली गोलप (शाखा क्र. 18) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.