
एका तरुणाचे चक्क एका बाहुलीवर प्रेम जडले आहे. हे प्रेम एवढे विकोपाला गेले आहे, की काही दिवसांपूर्वीच या तरुणाने त्या बाहुलीशी साखरपुडा केला. आता लवकरच तो तिच्याशी लग्नही करणार आहे. या तरुणाचे नाव जी टियनरॉन्ग असून ही बाहुली म्हणजे सेक्स डॉल आहे.
हाँगकाँगमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहणारा जी टियनरॉन्ग 36 वर्षांचा आहे. त्याने त्याच्या सेक्स डॉलचे नाव मोची असे ठेवले आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, कोणत्याही तरुणीपेक्षा सेक्स डॉलसोबत डेटला जाणं जास्त सोप आहे. त्यामुळे आता त्याने आयुष्यभर सेक्स डॉलसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बाहुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय त्याने वयाच्या 26 व्या वर्षी घेतला. एकदा एका रिटेल स्टोअरमध्ये त्याने एका बाहुलीला पाहिले होते. त्या बाहुलीची किंमत 80 हजार युआन म्हणजे 9 लाख होती. तेव्हा ती बाहुली विकत घेण्याची त्याची ऐपतही नव्हती. मात्र त्याच क्षणी त्याने बाहुली विकत घ्यायचे ठरवले. शिवाय त्याच क्षणी त्याने कोणत्याही तरुणीऐवजी सेक्स डॉलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
2019 मध्ये जी टियनरॉन्गने एका संकेतस्थळावर मोची या सेक्स डॉलविषयी जाहिरात बघितली होती. ही बाहुली त्याने 10 हजार युआन म्हणजे 1 लाख रुपयांना विकत घेतली. त्याने जेव्हा तिला घरी आणले तेव्हा त्याला खूपच आनंद झाला, कारण त्याचे बऱ्याच वर्षांपूर्वीचे स्वप्न साकार झाले होते. तो तिची व्यवस्थित काळजी घेऊ लागला. विशेष म्हणजे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत त्याने मोचीबरोबर साखरपुडा केल्यानंतर ज्या अपेक्षा एखाद्या पत्नीला नवऱ्याकडून असतात त्या सर्व पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. यासाठी तिला लागणाऱ्या सर्व सुविधांकडे त्याचे लक्ष असते, मात्र मोची माझ्याकडे काहीही मागत नाही, असेही तो सांगतो.
नुकतेच त्याने तिला आयफोन-12 आणि महागडे कपडे भेट म्हणून दिले आहेत. तसेच त्याने मोचीसोबत कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत, तसेच तिला कधी किसही केले नाही, असा दावा केला आहे.
























































