प्रेयसीच्या हत्येप्रकरणी प्रियकराला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याप्रकरणी प्रियकराला सोलापूर सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. महिबूब उर्फ फिरोज जमादार (रा. मुल्माबाबा टेकडी) असे शिक्षा झालेल्यांचे नाव आहे. तर बिल्किस शेख असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. महिबूब याचे गल्लीतील बिल्किस शेख या विवाहितेशी गेल्या चार-पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. बिल्किस हिला दोन मुले असून, ती पतीला सोडून माहेरी राहत होती. महिबूब हा बिल्किसवर चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. घटनेच्या दिवशी त्याने चाकूने वार करून तिची हत्या केली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. यात नऊ साक्षीदार तपासले. सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी साक्षी व पुराव्यावरून आरोपी महिबूब याला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. यामध्ये सरकार पक्षातर्फे अॅड. प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले.