
>> चित्रा प्रकाश क्षीरसागर
मराठी भाषेत महिला साहात्यिक अनेक आहेत. जुन्या पिढीत संजीवनी, इंदिरा अशा कवयित्री. तर ललित लेखन करणाऱयांमध्ये दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे ही नावे ठळकपणे डोळ्यांसमोर येतात. दुर्गा भागवत यांचा 10 फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्त दुपानी या त्यांच्या वैचारिक ललितलेख संग्रहातून उलगडत जाणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व…
साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो आणि साहित्यिकाचे साहित्य हा त्या साहित्यिकाचे दर्शन घडविणारा आरसा असतो. मराठी साहित्यातील वैचारिक ललित लेखन करणाऱयांमध्ये दुर्गाबाई भागवत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. दुर्गा भागवत या मराठी साहित्यात ललित स्वरूपाचे विपुल लेखन करणाऱया साहित्यिक. त्यांच्या ‘दुपानी’ या ललित लेखसंग्रहात त्यांनी अगदीच छोटे लेख लिहिले आहेत. वहीच्या दोन पानांइतका मजपूर त्यात आहे. आपल्याला रोजच्या जीवनातदेखील अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवून जातो तो टिकून ठेवायला हवा. अशा छोटय़ा वाटणाऱया अनुभवांतून व व्यक्तींच्या सहवासातील क्षणांतून लेखकाला काही विलक्षण अनुभवविश्व सापडत असते.
‘दुपानी’ या ललित लेखसंग्रहात दुर्गाबाईंनी आयुष्यात आलेल्या स्फूट अनुभवांवर छोटय़ा दोन पानांमध्ये मावेल इतक्या कमी शब्दांत लालित्यपूर्ण लेखन केले. साधारणतः 1974 पासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला. त्याआधी ललित लेखन वृत्तपत्राचे अर्धे क्वचितप्रसंगी पूर्ण पानही असायचे. त्यातून लेखकाची वैचारिकता व विद्वत्ता दिसे. प्रचंड बोजड शब्द त्यातून असायचे. क्षणजीवी भाव भावनांना शब्दांत पकडण्याची शैली त्यांना 1975 पासून म्हणजे आणीबाणीच्या काळापासून आत्मसात झाली.
‘दुपानी’ या संग्रहात सव्वाशे प्रसंग शब्दबद्ध केले आहेत. लेख लहान असले तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही. ‘दुपानी’मधील लेखन हे त्याची प्रचीती देणारे आहे. दुपानीमधील पहिलाच लेख पाठीराखा इतका लहान आहे, परंतु तो अगदीच अनुभवसंपन्न करणारा आणि प्रेरक संदेश देणारा आहे.
झाडांना संवेदना असतात, जीव असतो हे आपल्या हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. जगदीशचंद्र बोस यांनी हा सिद्धांत सिद्ध केला आहे. झाडांना चालता येत नाही, पण जागच्या जागी हलता येते, असे दुर्गाबाई ‘झाडांचे आव्रंदन’ या लेखात सुरुवातीलाच म्हणतात. दुर्गाबाईंनी या लेखात झाडे पैंजण घालून नाचतात, याचा अनुभव कथन केला आहे.
झाडे आणि फुलांचे आकर्षण संवेदनशील असलेल्या प्रत्येकाला असते. ‘पुष्पसुगंध’ या लेखात त्या प्रश्न करतात की, फुले कशी असावीत आकर्षक, रंगीत की सुगंधी हिंदुस्थानी परंपरेत सुगंधी फुलांना महत्त्व आहे. निसर्गातील अनेक दुर्लक्षित घटकांकडे दुर्गाबाई निर्देश करतात. याच लेखात त्या म्हणतात, हिंदुस्थानी मना तू फुलांचे रंग, रूप यांचा पूर्ण आस्वाद पुष्पपरायणतेत जगात सार्थ हो. ही आपल्या अंतरातला सुगंधी बाणा जपत राहा, असे सांगतात. ‘गौर गांधारी’ या लेखातदेखील त्यांनी पांढऱया रंगाची फुले असणाऱया गौर गांधारीचे सुरेख वर्णन केले आहे. 1987 ची एक घटना त्यांनी त्यात वर्णन केली आहे. मुंबईतील चर्नी रोडवरील गौर गांधारीचे वर्णन या लेखात त्या करतात. साधारणतः वैशाखात हे झाड फुलते. त्याची महती दुर्गाबाईंनी आपल्या मित्रमंडळीत सांगितली. पुतुहलाने सांगितल्यानंतर अनेकांनी ते झाड प्रत्यक्ष पाहिले. आपण जे अनुभवले ते इतरांनी अनुभवावे असा संदेश त्या या लेखातून नकळत देतात. तीन दिवस दुर्गाबाईंनी त्या झाडाकडे जाता आले नाही. चौथ्या दिवशी त्या पाहतात तर पांढऱया फुलांचा मोठा डेराच पुणीतरी तेथे ठेवला आहे, असा भास झाल्याचे त्या नमूद करतात. बारकाईने निरीक्षण, अवलोकन आणि त्याचा भरभरून आनंद घ्यायची दुर्गाबाईची वृत्ती यातून दिसते.
या पुस्तकातील अनेक लेख हे व्यक्तिगत अनुभवांवर आधारित आहेत. ते व्यष्टीचे आहेत. समष्टीचे ते कसे होतील याबाबत दुर्गाबाईंनी प्रयत्न केले आहे. दृष्टीलाभ या लेखात दुर्गाबाईंनी आपल्या स्वतःच्या डाव्या डोळ्याच्या मोतिबिंदूची 1992 मध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरच्या एखाद्या गोष्टीकडे नव्याने पाहण्याची दृष्टी कशी मिळाली. पुमुद मेहता यांनी दुर्गाबाईंना एक लुगडे (साडी) भेट दिली होती. मोतिबिंदूमुळे दृष्टी धूसर झाल्याने त्यांना ते इंदुरी गुलाबी लुगडे तीन रंगीत पट्टे निघाल्याने त्यांनी ते वापरणे बंद केले होते, परंतु मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तेच लुगडे त्यांना पैठणीसारखे सुंदर दिसू लागले.
दुर्गाबाई केवळ निसर्गवर्णनात रमत नाहीत. त्या स्वतः पाककलानिपुण आहेत. त्या धार्मिक वृत्तीच्या नाहीत. परंतु स्वयंपाक ही पोटपूजाच आहे, असे त्या मानत. त्या म्हणतात, मी देवदेव करणारी नसले तरी अन्नपूर्णेची भक्त आहे. उत्तम पाककृती करणाऱया अन्नपूर्णेच्या भक्तांना मी मानते. हे भक्त मात्र फुटक्या शेगडीवर रस्त्याच्या कडेला बसून सुंदर भाकऱया हातावर करताना दिसतात. मोठमोठय़ा समारंभासाठी मांडे करताना दिसतात. एकेका भाजीला सात फोडण्या त्या महिला घालतात. दोन-तीन फोडण्या आपल्याला माहीत असतात, परंतु सात सात फोडण्यांची भाजी फारशी परिचयाची नसते. दुर्गाबाई या लेखात आपल्या बी नावाच्या चुलतीची आठवण सांगतात. काकी तुझा स्वयंपाक इतका कसा छान होतो, असे विचारल्यावर ती सांगायची ‘काही नाही गं, थोडासा जीव त्यात घालते.’ स्वयंपाक ही अन्नपूर्णेची पूजा, उदरभरण हे यज्ञकर्म, अन्न हे ब्रह्म अशा संकल्पना हिंदुस्थानी संस्पृतीने सांगितल्या आहेत. त्याची या लेखात साक्ष पटते.
या लेखात एक महत्त्वपूर्ण वाक्य आहे , खाण्याचा आणि खाऊ घालण्याचाही गुण अंगी असला तरच जीवनाला लज्जत येते. सामाजिक बांधिलकीला याची गरज नाही, असे कोण म्हणेल? प्राचीन काळात पार्वती आणि सीता या पाककला निपुण होत्या तसेच भीम आणि नल-दमयंतीमधील नलराजा हादेखील पाककला निपुण होता.
दुर्गाबाई स्वतः एक सामाजिक कार्यकर्त्या असल्याने समाजभान हा त्यांच्या साहित्याचा एक गुणवैशिष्टय़ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 1957 साली दुर्गाबाई तमाशा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. तमासगार परिषदेचे अध्यक्षपद आल्यावर तमासगीर आणि त्यातील बायांच्या समस्या दुर्गाबाईंनी जाणून घेतल्या. त्यांची बाजू घेतल्याने समाजातील लब्ध प्रतिष्ठत असे के. नारायणराव काळे आणि पृष्णराव मराठे यांनी तमासगीर बायांची बाजू घेऊन तू समाजात अनीती पसरवितेस, असा आक्षेप घेतला. ही बाई वाह्यात आहे असे म्हटले, परंतु दुर्गाबाईंनी आपले काम थांबवले नाही. स्त्रीयांना तुच्छ लेखणाऱया त्या काळातील पुरुषप्रधान संस्पृतीला ही चपराक त्यांनी आपल्या पृतीतून दिली होती, हे विशेष.
त्यांची आत्या सीताबाई या लोणचे तयार करण्यात निपुण होत्या. खास वैशिष्टय़पूर्ण लोणच्याची चव एकदा पुणी घेतली की तो ते लोणचे वारंवार मागत असे. साहित्य संमेलनाचे एक अध्यक्ष दादासाहेब करंदीकरांना ते खूप आवडत असे. त्याची कृती सीताबाईंनीच करावी. परंतु तिच्या निधनानंतर दुर्गाबाईंनी तसे लोणचे करून पाहिले. पण ती सीताबाईची चव काही त्याला आली नाही. सर्व साहित्य तेच असूनही ते लोणचे सीताबाईचे न होता दुर्गाबाईचे होते. या लेखातून दुर्गाबाई हेच सुचवतात की, आपण आपले गुणवर्णन करतो तसे आपल्या अवगुणाची किंवा आपल्यातील उणिवांची लाज न बाळगता त्याचेही वर्णन केले पाहिजे.
‘दुपानी’ या लेखसंग्रहातील एपंदरीत लेखांतून दुर्गाबाईंचे जीवन उलगडत जाते. त्यांची एक कुटुंबवत्सलतेची जाण असलेली पारंपरिक हिंदुस्थानी स्त्राr त्यातून भेटते. काैटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन घडते. दुर्गाबाईंची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत, परंतु माझ्यातील काैटुंबिक आपुलकी बाळगणाऱया गृहिणीला दुर्गाबाईंचे हे मनोज्ञ दर्शनच अधिक भावले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन.



























































