
पुण्यात खरेदीच्या निमित्ताने मोबाईल शॉपीमध्ये आलेल्या चोरट्याने 1 रुपयांचे दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना दोन दिवसांपुर्वी गुडलक चौकातील मोबाईल एक्सप्रेस शॉपमध्ये घडली. याप्रकरणी गणेश पाटील यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी गणेश पाटील यांची सागर आर्केडमध्ये मोबाईल शॉपी आहे. दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी सातच्या सुमारास एकजण शॉपीत मोबाईल खरेदी करण्यासाठी आला होता. त्याने गणेश यांची नजर चुकवून 1 लाख 3 हजारांचे दोन मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे तपास करीत आहेत.
येरवड्यातून लॅपटॉप चोरीला
पुणे-एअरपोर्ट रस्त्यावरील तुळलक्ष्मी प्रोफेशनल सर्व्हिसेसमधून चोरट्यांनी 25 हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. ही घटना 3 फेबु्रवारीला घडली असून याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस हवालदार काळे तपास करीत आहेत.

























































