केंद्राच्या बजेटचा गरीबांना फायदा नाही! पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील भाजप सरकारमुळे आज पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले. पेंद्राचे बजेट हे 4 ते 5 उद्योगपतींसाठीच असून त्याचा गरीबांना फायदा नाही. घरगुती गॅस 2014 मध्ये 392 रुपये होता तो आज भाजप सरकारच्या काळात 719 रुपये झाला. आता पुठे आहेत हेमा मालिनी, स्मृती इराणी, रामदेव बाबा आता गप्प का, असा सवाल करीत मुंबई काँग्रेस अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आज दादर पूर्व येथे महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

दादर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ येथून दादर स्टेशन, दादर पूर्व येथे मोर्चा काढत मुंबई काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज कार्यक्रमानिमित्त मुंबईत होत्या, त्यानिमित्त हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, माजी खासदार एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते सचिन सावंत व राजू वाघमारे, काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन व भाजप सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.