
पाचव्या मानांकित ठाण्याच्या सिद्धेश पांडेने उपनगर टेबल टेनिस असोसिएशनच्या चिन्मय सोमय्याचा 12-10, 11-5, 9-11, 9-11,11-7, 11-6 असा पराभव करत उपनगर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित डॉ. रमेश प्रभू स्मृती 82 व्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे जेतेपद मिळवले. या स्पर्धेचे आयोजन विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संपुल येथे करण्यात आले आहे. राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू काwशलपुमार चिमा यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस आणि प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संपुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ठाण्याचा सिद्धेश पहिल्या गेममध्ये 4-10 असा पिछाडीवर होता. यानंतर त्याने जोरदार पुनरागमन करत पहिला गेम 12-10 असा आपल्या नावे केला. दुसरा गेम जिंकत त्याने सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. चिन्मयने सामन्यातील पुढचे दोन गेम जिंकत सामना बरोबरीत आणला. सिद्धेशने पुन्हा आपला खेळ उंचावत सलग दोन गेम जिंकत जेतेपदावर आपले नाव कोरले.
पुरुष गटाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सिद्धेश पांडेने सनील शेट्टीला 11-8, 8-11, 15-13, 12-10, 10-12, 4-11, 11-4 असे पराभूत केले. सामन्यातील पहिला गेम 11-8 असा जिंकत सिद्धेशने चांगली सुरुवात केली. दुसऱया गेममध्ये सनीलने 11-8 अशी चमक दाखवत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर सिद्धेशने सलग दोन गेम जिंकत सामन्यात 3-1 अशी आघाडी घेतली. पण सनीलने सलग दोन गेममध्ये चमक दाखवत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये सिद्धेशने छाप पाडत सामना जिंकला.
दुसऱया उपांत्य लढतीत चिन्मय सोमय्याने शिवम दासला 7-11, 13-11, 11-7, 14-16, 14-12, 11-3 असे नमविले. सामन्यातील पहिला गेम शिवमने 11-7 असा जिंकला. यानंतर चिन्मयने सलग दोन गेम जिंकत सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली. दासने पुढचा गेम जिंकत सामना 2-2 असा बरोबरीत आणला, पण चिन्मयने आपला खेळ उंचावत सलग दोन गेम जिंकले आणि सामन्यात विजय मिळवला.


























































