
एमजी मोटर इंडियाने हेक्टर 2021 मधील सर्वात नवा ऑप्शन सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय लाँच केला आहे. एमजीने हेक्टर 2021 पेट्रोल इंजिन लाइनअपमध्ये विविध चार पर्याय दिले आहेत. त्यात एमटी, हायब्रिड एमटी, सीव्हीटी, आणि डिसीटी यांचा पर्याय आहे. सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय 5 आसनी तसेच सहा आसनी हेक्टरमध्ये उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे आरामदायी व धक्का विरहित प्रवासाचा अनुभव मिळतो. तसेच गिअर तत्काळ बदलता येत असल्यामुळे ओव्हरटेक करणे सोपे जाते. या कारची एक्स शोरूम किंमत 16.51 लाख रूपये आहे.































































