पुणे – पायलिंग मशीनचा धक्का लागल्यामुळे तरूण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बांधकाम प्रकल्पावर पायलिंग मशीनचा धक्का लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी प्रसाद पाइल्स प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर विशाल दिनेश चोबे (वय – 26, सध्या रा. धायरी, मूळ उत्तरप्रदेश) आणि पायलींग मशीनचा चालक अजय विजय बहादुर यशपाल (वय – 24, रा. वडगाव बुद्रुक, मूळ उत्तरप्रदेश) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय मनेक टेकाम (वय – 20, रा. धर्मावत नगर लेबर कॅम्प मध्य प्रदेश) असे ठार झालेल्याचे नाव आहे. पोलीस हवालदार विशाल गवळी यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वडगाव खुर्द परिसरात सुंदर संस्कृती फेज 4 इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी पायलिंग मशीनद्वारे काम करण्यात येत आहे. अक्षय त्याठिकाणी काम करत होता. काम सुरू असताना हलगर्जीपणा झाल्याने पायलिंग मशीनचा धक्का अक्षयला लागला. त्यामुळे अक्षय गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आरोपींचा निष्काळजीपणा केल्यामुळे अक्षयचा मृत्यू झाला असल्याचे उघडकीस आल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.