
दिल्लीत एका बलात्कार पीडितेच्या हातावर आरोपीचे नाव टॅटूने लिहिले होते. या आधारावर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
दिल्लीत एका महिलेने एका व्यक्तिच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली होती. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पीडितेचे लग्न झाले होते. पण आरोपीने धमकावून आपल्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. दोघांमध्ये 2016 ते 2019 दरम्यान शारीरिक संबंध होते. परंतु आरोपीने धमकावून आपल्यावर बलात्कार केल्याचे महिलेने म्हटले आहे.
महिलेच्या हातावर आरोपीच्या नावाचा टॅटू आहे. टॅटू काढणे ही कला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच पीडित महिलेच्या हातावर जो टॅटू आहे तशा प्रकारचा टॅटू काढणे सोपे नाही. या आधारवर कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
तर दुसरीकडे आरोपीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पीडित महिला आपल्या ओळखीची असून तिनेच आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तसेच तिने आपल्याशी प्रेमसंबंध निर्माण करून सेल्फी क्लिक करून सोशल मीडियावर टाकल्याचे आरोपीने म्हटले आहे.



























































