‘टिकटॉक’ला टक्कर देणार ‘ठिकठाक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अॅप टिकटॉकसह इतर चायनीज अॅप हिंदुस्थानातून बॅन झाल्यानंतर अनेकजण या अॅपला पर्याय शोधत आहेत. टिकटॉकला टक्कर देण्यासाठी एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने ’ठिक ठाक’ नावाचे अॅप तयार केले आहे. महत्त्वाचे म्हणजे आठ हिंदुस्थानी भाषांमध्ये हे अॅप उपलब्ध आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱया हिंदुस्थानी वंशाच्या सायना सोढी या मुलीने ’ठिक ठाक’ अॅपची निर्मिती केली आहे. सायना म्हणाली, ‘टिकटॉक’चे इंडियन व्हर्जन आणण्याची माझी बऱयाच दिवसांपासून इच्छा होती. ती यानिमित्ताने पूर्ण झाली आहे.’ द सायना का@र्पेरेशन अंतर्गत तिने गतवर्षी जानेवारीत या अॅपचे बेसिक मॉडेल तयार केले. नोव्हेंबरमध्ये हे अॅप पूर्णपणे तयार झाले असून यावर व्हिडीओ अपलोडिंग, शेअरिंग, एडिटिंग टुल्स, कोड स्क@नर आणि जियोलोकेशन रिअॅक्शन अशा सुविधा आहेत. पुढच्या महिन्यात अॅपचे अपडेटेड व्हर्जन लाँच होणार आहे.