
सध्याची स्मार्टवॉचची क्रेझ बघता फेसबुक कंपनी लवकरच स्वत:चे स्मार्टवॉच घेऊन येणार आहे. फेसबुकच्या स्मार्टवॉचचे पुढीच वर्षी लाँचिंग हेऊ शकते. फेसबुकच्या स्मार्टवॉचमधून युजर्सला व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मॅसेंजरचे मेसेज पाठवता येणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टवॉचमध्ये काही कम्युनिकेशन फिचर्स सुद्धा दिले आहेत. त्याचसोबत स्मार्टवॉचमध्ये काही आरोग्य आणि फिटनेस फिचर्स असतील. स्मार्टवॉचसाठी फेसबुक कंपनी स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम विकसित करत आहे. याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. मार्पेटमध्ये सध्या अॅपल कंपनीचे स्मार्टवॉच आघाडीवर आहेत. त्यांना टक्कर देणारे हे वॉच असेल अशी चर्चा आहे.
























































